दीपिकाची चौकशी सुरु; मोबाईल घेतला काढून! | पुढारी

दीपिकाची चौकशी सुरु; मोबाईल घेतला काढून!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सुरू असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. इंडस्ट्रीतील चार बड्या अभिनेत्रींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांना समन पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची आज चौकशी होणार आहे. दीपिका, सारा आणि श्रद्धा यांना एनसीबीचे अधिकारी ड्रग्ज चॅट संबंधी चौकशी करतील. दरम्यान दीपिका कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. 

या तिघींची चौकशी करणाऱ्या टीममध्ये एसआयटीचे हेड केपीएस मल्होत्रा यांच्यासोबत तपास अधिकारी सुनील कुमार आणि इंटेलिजेन्सचे अधिकारी नीरज कुमारदेखील सहभागी झाले. एनसीबीची टीम दीपिका पादुकोणच्या ड्रग्जशी संबंधित चॅटची चौकशी करेल. केपीएस मल्होत्रा आता एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर आहेत. केपीएस मल्होत्रा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनचा तपास करणाऱ्या एसआयटीचे नेतृत्व करत आहेत. 

दीपिका पादुकोण आणि जया शाह यांची चॅट समोर आली होती. यामध्ये दीपिकाने माल शब्दाचा वापर केला आहे. माल म्हणजे ड्रग्ज आहे का? याबद्दल चौकशी होत आहे. सारा आणि श्रद्धाशी सुशांत सिंह राजपूत आणि टापूवर झालेल्या पार्टीविषयी प्रश्न विचारले जातील. 

दरम्यान, शुक्रवारी दि. २५ रोजी एनसीबीने अभिनेत्री रकुलप्रीतची चौकशी केली. यावेळी रकुलप्रीतने अनेक मोठे  खुलासे केले. तसेच दीपिकाची मॅनेजर करिश्माचीदेखील एनसीबीने चौकशी केली.

वाचा – #StandWithDeepika सोशल मीडियात दीपिकावर कमेंट्सचा पाऊस!

Back to top button