सोशल मीडियात दीपिकावर कमेंट्सचा पाऊस! | पुढारी

सोशल मीडियात दीपिकावर कमेंट्सचा पाऊस!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या संबंधित ड्रग्ज प्रकरणात रोज नवीनवीन माहिती समोर येत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेसलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग यासारख्या अभिनेत्रींची चौकशी एनसीबीकडून सुरू आहे.

आज एनसीबी दीपिका पादुकोणची चौकशी करणार आहे. दीपिकाची शुक्रवारी चौकशी होणार होती. परंतु, गुरुवार रात्री ती गोव्याहून मुंबईत पोहोचली. त्यामुळे आता आज (दि.२६) एनसीबी चौकशी करेल. आता दीपिकाविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही युजर्सनी #StandWithDeepika हा हॅशटॅग चालवत तिला पाठिंबा दर्शवला आहे. तर काही युजर्सनी तिच्यावर फनी कॉमेंट्स, मीम्स करत टिकाही केली आहे. 

अधिक वाचा – दीपिका अडकल्यास ‘त्यांना’ ६०० कोटींचा चुना!

ड्रग्ज चॅटसंबंधी ग्रुपची दीपिका होती अ‍ॅडमिन

दीपिका, गोवामध्ये शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मग्न होती. तेव्हा ड्रग्स प्रकरणात तिचे नाव समोर आले होते. दीपिका पादुकोणसह एनसीबीने सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवलं होतं. 

सोशल मीडियावर दीपिकाबद्दल युजर्स काय म्हणाले पाहा –

– दीपिका पादुकोणला आठवणीत ठेवा, आता आपण तिला समर्थन करण्याची वेळ आहे. 

– ते लोक जे # StandWithDeepika ट्रेंड करत आहेत, आपण ऐकलं नाही का, की त्यांना दिखाव्यासाठी पैसे मिळतात….

– ते सर्वजण आमच्या भावनांशी खेळतात आणि आपण एकमेकांशी भांडत बसतो. 

– तर प्रचार करणाऱ्यांनी #StandWithDeepika सुरू केलं आहे का?

– always with deepika #StandWithDeepika 

– दीपिका पादुकोण आणि रिया सगळे सारखेच. बॉलिवूड फेकनेसने भरले आहे. ते स्वत:ला भगवान समजायला लागले होते आणि आम्हीदेखील त्यांच्याविषयी विचार करत असतो. वेडे!

– स्वावलंबी आणि आत्मविश्वास असलेल्या स्त्रियांवर झालेले आरोप अद्याप सिद्ध झाले नाही. #StandWithDeepika 

– #StandWithDeepika तिच्याबरोबर फक्त बॉलिवूड उभे राहिल. भारत नाही. कारण आता एनसीबी बॉलिवूडमधील प्रत्येक जणाचे वास्तव काय आहे, हे पाहू शकतो. 

सोशल मीडियावर आणखी काही युजर्स काय म्हणाले पाहा- 


Back to top button