ड्रग्ज पार्टीच्या आरोपाने करण जोहरचा तिळपापड! | पुढारी

ड्रग्ज पार्टीच्या आरोपाने करण जोहरचा तिळपापड!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची दिशा आता चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शनकडे वळली आहे. मात्र, करण जोहरने ड्रग्ज संदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत धर्मा प्रॉडक्शनसोबत कोणताही संबध नाही असे स्पष्ट केले. तसेच, २०१९ मध्ये माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्न सेवन करण्यात आले ही निव्वळ अफवा असून असा कोणताच प्रकार त्यादिवशी घडला नाही असेदेखील करण जोहरने स्पष्ट केले आहे. 

अधिक वाचा : आणि दीपिका आणि श्रद्धाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला सपशेल गंडवलं!

ड्रग्ज प्रकरणी धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद आणि सहायक दिग्दर्शक अनुभव चोपडाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, क्षितिजच्या चौकशीमुळे करण जोहरबरोबरच अभिनेता शाहरुख खानच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वीच करण जोहरने स्पष्टीकरण दिले आहे.

काही इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझ्या आणि धर्मा प्रॉडक्शनसंदर्भात चुकीचे निर्देश काढले जात आहेत. तसेच, २८ जुलै २०१९ ला माझ्या घरात झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, माझा आणि धर्मा प्रॉडक्शनचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही. तसेच, क्षितिज प्रसाद आणि अनुभव चोपडा या दोघांपैकी कोणीही माझा सहकारी किंवा जवळचा मित्र नाही. अनुभव चोपडा माझ्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये कामगार नव्हता. त्याने २०११ आणि २०१३ दरम्यान, वैयक्तिक कंपनीसोबत दोन प्रोजेक्टसवर काम कले होते. तसेच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे राहतात किंवा काय करतात याच्याशी मला किंवा धर्मा प्रोडक्शनला काही घेणे-देणे नाही, असे करण जोहरने स्पष्ट केले आहे. 

अधिक वाचा : दीपिकाची चौकशी सुरु; मोबाईल घेतला काढून!

तसेच, माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते. यापूर्वीदेखील मी सांगितले आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. आमच्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणण्यात आलेच नव्हते आणि कोणी त्याचं सेवनही केले नव्हते. आणि अशा गोष्टींसाठी कधी कोणाला प्रोत्साहन किंवा पाठिंबादेखील देत नाही. असेदेखील स्पष्टीकरण करण जोहरने दिले आहे. 

करण जोहरच्या घरी २०१९ मध्ये झालेल्या पार्टीत करण दीपिका, विकी कौशल, रणबीर कपूर, वरुण धवन, झोया अख्तर, शाहीद कपूर, मलायका अरोरा यांच्यासहित अनेक सेलिब्रेटी पार्टीत उपस्थित होते. पार्टीत हजेरी लावलेल्या सर्व सेलिब्रेटींना एनसीबीकडून समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : ड्रग्ज चॅटसंबंधी ग्रुपची दीपिका होती अ‍ॅडमिन

Back to top button