सुशांत ड्रग्ज घेत होता, त्याच्यासोबत रिलेशीनशिपमध्ये होते;आता सारानंही केला खुलासा! | पुढारी

सुशांत ड्रग्ज घेत होता, त्याच्यासोबत रिलेशीनशिपमध्ये होते;आता सारानंही केला खुलासा!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

सुशांत ड्रग्ज घ्यायला असा खुलासा सारा अली खान हिने चौकशी दरम्यान केला आहे. मात्र, मी ड्रग्ज घेतलेले नाही. तसेच मी आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होतो असे वक्तव्यही तिने यावेळी केले. बॉलिवूडमधील डग्ज सेवन प्रकरणात अनेक सनसनाटी खुलासे आतापर्यंत झाले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह १६ जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. 

या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचीही नावे समोर आली होती. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. आज एनसीबीकडून दीपिका, सारा आणि श्रद्धा यांची चौकशी करण्यात येत आहे. तिघीही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात पोहोचल्या आहेत. दरम्यान, एनसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार दीपिकानं चौकशीत ड्रग्ज चॅट केल्याचं कबूल केलं आहे. दीपिकाकडून काही प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देत नसल्याचेही समोर आलं आहे.

दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशची एनसीबीने चौकशी केली होती. चार तास रकुलची सुद्धा चौकशी करण्यात आली. सुशांतच्या प्रकरणात ड्रग्ज अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रियाच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली आहेत. सुशांतच्या लोणावळ्यातील फार्म हाऊसमध्ये केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाची माहिती मिळाली होती.

Back to top button