बॉलीवूडची थाली घाणेरडीच असेल तर छेद केलाच पाहिजे | पुढारी

बॉलीवूडची थाली घाणेरडीच असेल तर छेद केलाच पाहिजे

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण, त्यानंतर समोर आलेले ड्रग्ज कनेक्शन, एनसीबीने विविध अभिनेत्रींना पाठवलेले समन्स या सगळ्या विषयांवर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परखड मते मांडली आहेत. ही मते मांडत असताना संसदेत जे या प्रकरणाचे पडसाद उमटले होते, त्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. बॉलीवूडची थाली घाणेरडीच असेल तर छेद केलाच पाहिजे, असे म्हणत त्यांनी खा. जया बच्चन यांनाही टोला लगावला. मात्र त्यांचा थेट नामोल्लेख केला नाही.  

एका अभिनेत्रीने संसदेत मध्यंतरी असे भाष्य केले की जिस थाली में खाते हैं उस थाली में ही छेद करते हैं! आता सगळीच तुमची थाली घाणेरडी असेल तर छेद केलाच पाहिजे. एनसीबीने चमकोगिरी न करता या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे. ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे या ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर आली आहेत, त्यांनी मनाची श्रीमंती दाखवून आपण जे कृत्य केले आहे ते कबूल करावे, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग हा या सगळ्या प्रकरणातला मोठा डॉक्युमेंट्री पुरावा आहे, असेही निकम यांनी म्हटले आहे. 

Back to top button