'माल' घेत नाही तर १२ वकिलांची फौज कशाला? | पुढारी

'माल' घेत नाही तर १२ वकिलांची फौज कशाला?

मुंबई: पुढारी ऑनलाईन

ड्रग्ज प्रकरणी आज बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण, अभिनेत्री सारा अली खान, आणि श्रद्धा कपूर यांची आज चौकशी करण्यात आली. चौकशीपूर्वी दीपिकाने १२ वकिलांची फौज तयार ठेवली असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली होती. या चर्चेवरून अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने दीपिकावर निशाणा साधला आहे. माल घेत नाहीस तर मग १२ वकिलांची फौज कशाला? असा उपरोधिक सवाल तिने उपस्थित केला आहे. 

”माल जर घेत नसशील तर १२ वकिलांसोबत सल्ला-मसलत करण्याची काय गरज होती. असा सवाल शर्लिनने दीपिकाला केला. तसेच, खरं बोलणारे लोक कधी अस्वस्थ होत नाही ना त्यांना  येतो. जेथे निडरता आहे तिथे भितीला जागा नसते. असा टोमणाही शर्लिनने दीपिकाला लगावला.

अधिक वाचा:दीपिकानं केला सनसनाटी खुलासा! 

यासोबतच ती पुढे म्हणाली, दीपिका पदुकोणच्या नावात बदल करण्याची वेळ आली आहे. रिपीट आफ्टर मी मादक पदार्थांचे सेवन हा एक गंभीर आरोप आहे, माल मिळाला नाही तर मनःस्थिती बदलते आणि नैराश्याला कारणीभूत ठरू शकते. असे खोचक टोमणेदेखील शर्लिनने दीपिकाला लगावले आहेत. 

अधिक वाचा: सुशांत ड्रग्ज घेत होता, त्याच्यासोबत रिलेशीनशिपमध्ये होते;आता सारानंही केला खुलासा!

यापूर्वीही एका मुलाखतीदरम्यान शर्लिनने दीपिकावर निशाणा साधला होता. ड्रग्जच्या सेवनामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती, असा गंभीर आरोप शर्लिनने केला होता. दीपिकासह शर्लिनने अभिनेता शाहरूख खान यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. तसेच, क्रिकेट विश्वातील काही जण ड्रग्ज घेत असल्याची कबुलीही शर्लिनने एका मुलाखतीदरम्यान दिली होती. 

अधिक वाचा: करण जोहरला धक्का! धर्मा प्रॉडक्शनचा दिग्दर्शक क्षितीज रवीप्रसादला एनसीबीकडून अटक

ड्रग्जसंदर्भात व्हायरल झालेल्या व्हॉट्सअप चॅट नंतर एनसीबीकडून दीपिका, सारा आणि श्रद्धा यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीदरम्यान, दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याचे कबूल केले. पण सेवन केले नसल्याचे तिने म्हटले आहे.  

Back to top button