सुशांतप्रकरणी कोणत्याच गोष्टीचा इन्कार नाही  | पुढारी

सुशांतप्रकरणी कोणत्याच गोष्टीचा इन्कार नाही 

नवी दिल्ली/ मुंबई : वृत्तसंस्था :

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने एक महिन्यानंतर आपले निवेदन जाहीर केले असून त्यामध्ये आपण कोणत्याच गोष्टींचा इन्कार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर या निवेदनावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंह प्रकरणाच्या निकालासाठी आपणही उत्सुक असल्याचे सांगून सीबीआयला टोला लगावला आहे. 

सुशांतसिंहने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास सीबीआय करीत आहे. मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. गेला महिनाभर तपास करणार्‍या सीबीआयने  एक महिन्यांनी निवेदन जाहीर केले आहे.  

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी सीबीआय पूर्णपणे व्यावसायिकद‍ृष्टीने या प्रकरणाची चौकशी करत असून, यातील प्रत्येेक बाब तपासून पाहिली जात आहे. या प्रकरणाचा तपास  सुरू असून आपण कोणत्याही गोष्टीचा इन्कार केलेला नाही.  यावर प्रतिक्रिया देतााना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपणही या प्रकरणाच्या निकालासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

Back to top button