'आईने माफी मागितली की नाही माहित नाही पण बाप म्हणून मी मुलाकडून माफी मागतो' | पुढारी

'आईने माफी मागितली की नाही माहित नाही पण बाप म्हणून मी मुलाकडून माफी मागतो'

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉस १४ चा स्पर्धक आणि गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानूने मराठी भाषेचा अपमान केला होता. यानंतर निर्माण झालेल्या वादावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ने कलर्स वाहिनील शो बंद करण्याची धमकी दिली होती. परंतु, त्यानंतर कलर्सने माफीनामा जाहीर केला होता. आता जानच्या वक्तव्यावर कुमार सानू यांनीही माफी मागितली आहे. 

वाचा – मराठीचा अपमान: कलर्स वाहिनीची मुख्यमंत्र्यांकडे माफी!

कुमार सानू यांनी फेसबूक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते माफी मागताना दिसत आहेत. कुमार सानू म्हणतात, ‘नमस्कार उद्धव जी मी कुमार सानू, मला चांगलं वाटलं की, बीएमसीने कोविड काळात माझ्यावर लक्ष ठेवले. यासाठी मी धन्यवाद देतो. मी बीएमसीमुळे कोरोनावर मात करू शकलो.’

वाचा – जान सानूला बिग बॉसमधून हाकलून द्या; प्रताप सरनाईक भडकले

माझा मुलगा जान खूप चुकीचे वक्तव्य बोलला, ज्याचा आम्ही ४०-४१ वर्षांपूर्वी विचारदेखील केला नव्हता. ज्या मुंबई शहरात मुंबादेवीने मला हा आशीर्वाद दिला होता. मला प्रसिध्दी दिली. त्या मुंबादेवी, त्या महाराष्ट्राविषयी मी असा विचार करू शकत नाही. माझ्या मुलाने मराठी भाषेविषयी जे म्हटलं, मी सांगू इच्छितो की, मी सर्व भाषांचा आदर करतो. मी प्रत्येक भाषेत गाणे गायले आहे.’

मला माफ करा, माझ्या मुलाला, कुटुंबाला माफ करा: कुमार सानू 

कुमार म्हणाला, ‘माझा जो मुलगा आहे, मी २७ वर्षे त्याच्यापासून दूर आहे. मला माहित नाही की, त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली आहे. एक वडील होण्याच्या नात्याने मी माझ्या मुलाकडून आपली माफी मागतो. या प्रकारची गोष्ट ऐकल्यानंतर मला राहावलं नाही. मी प्रताप सरनाईक यांच्याशी बोललो आणि ते म्हणाले की, चिंतेची बाब नाही. मी पुन्हा एकदा क्षमा मागू इच्छितो. मला या महाराष्ट्राच्या धरतीने सगळं काही शिकवलं आहे. मला, माझ्या कुटुंबाला माफ करा. माझ्या एक्स कुटुंबालाही माफ करा.’

वाचा – ‘ जान सानू मुंबईत राहून तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो, लवकरच तुला स्वत:ची चीड येईल’

वाचा – चुंबन सम्राट इम्रान हाश्मी जेव्हा ‘धक-धक’ गर्ल माधुरी दीक्षितशी रोमान्स करतो! (video) 

Back to top button