दीपिकाची व्यवस्थापक करिश्माचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज | पुढारी

दीपिकाची व्यवस्थापक करिश्माचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशने कोर्टासमोर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. ती २६ सप्टेंबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या चौकशीनंतर घरी परतली. पण आता महिन्यानंतर चित्र बदलले. एनसीबीने पुन्हा करिश्माला चौकशीसाठी बोलावले आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी करिश्मा प्रकाशकडे ड्रग्स देण्याशी संबंधित पुरावे असल्याचे एनसीबी सूत्रांचे म्हणणे आहे. यानंतर २७ ऑक्टोबर रोजी करिश्माच्या घराची झडती घेतली असता १.७  ग्रॅम चरस आणि ३ सीबीडी तेलाच्या बाटल्या आढळल्या होत्या. करिश्माला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. पण ती आली नाही.

Back to top button