जेम्स बॉन्ड अभिनेते सीन कॉनेरी काळाच्या पडद्याआड | पुढारी

जेम्स बॉन्ड अभिनेते सीन कॉनेरी काळाच्या पडद्याआड

एडिनबर्ग : पुढारी ऑनलाईन

जेम्स बॉन्डची भूमिका साकारलेले हॉलिवूड अभिनेते सीन कॉनेरी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी सात चित्रपटांत बॉन्डची भूमिका साकारली होती. मूळचे स्कॉटिश वंशाचे असलेल्या सीन कॉनेरी यांना ऑस्कर, बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

वाचा : ‘काँग्रेसच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा नकार’

हॉलिवू़डच्या पडद्यावर सीन कॉनेरी यांचा तब्बल चार दशके दबदबा होता. उंच आणि देखणे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. स्कॉटलंडच्या एडिनबर्ग जवळील झोपडपट्टीत त्यांचे बालपण गेले. अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनी कॉफिन पॉलिशर, मिल्कमॅन, लाईफ गार्ड म्हणूनही काम केले.  

वाचा : कॅन्सरवर मात केलेल्या ‘मुन्नाभाई’चा लुक व्हायरल!

सीन कॉनेरी यांना जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठी सर्वांधिक प्रसिद्धी मिळाली. मोठ्या पडद्यावर जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ते पहिले अभिनेते आहेत. त्यांनी जेम्स बॉन्ड सोबतच द हंट फॉर रेड ऑक्टोबर (The Hunt for Red October), इंडियाना जोन्स एंड द लास्ट क्रूसेड (indiana Jones and the Last Crusade) आणि द रॉक ((The Rock) आदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांना अनटचेबल्स (The Untouchables) चित्रपटासाठी पहिल्यांदा १९८८ मध्ये ऑस्कर मिळाला होता. त्यात त्यांनी आयरिश पोलिसाची भूमिका साकारली होती.

 

Back to top button