वयाच्या सासष्ठीत रेखा 'काला चश्मा'वर थिरकल्या आणि रॅपर बादशाहही चकित झाला! (video) | पुढारी

वयाच्या सासष्ठीत रेखा 'काला चश्मा'वर थिरकल्या आणि रॅपर बादशाहही चकित झाला! (video)

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आपल्या अभिनय आणि सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या एका झलकसाठी चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. आज रेखा यांच वय ६६ असले तरीही त्या अभिनयात अतुलनीय आहेच त्याचबरोबर त्या एक उत्तम डान्सरही आहे. हे त्यांनी वेळोवेळी दाखवले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी आपण एक उत्तम डान्सर आहोत हे सिद्ध केले आहे. अलीकडेच रेखा यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रॅपर बादशाहच्या ‘मर्सी’ या गाण्यावर रेखा जबरदस्त स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये पाहता येईल की, रेखा यांनी काळे चष्मा घातला असून ती रॅपर बादशाहच्या ‘मर्सी’ या गाण्यावर जबरदस्त स्टाईलमध्ये नाचत आहेत. ६६ वर्षीय रेखा यांच्या या बिंदास्त डान्सवर रॅपर बादशाहही चकित झाला आहे. यावेळी रेखा यांनी क्रीम कलरची साडी घातली असून त्या अधिकच सुंदर दिसत आहेत. रेखा यांच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत असून ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

रेखा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये बरीच सुपरहिट चित्रपट दिली आहेत. आजही कोट्यवधी लोक त्यांच्या नृत्याचे आणि अभिनयाचे वेडे आहेत. रेखा यांनी अभिनयाची सुरूवात १९६६ मध्ये दक्षिण भारतीय चित्रपट ‘रंगुला रत्नम’ पासून केली होती. त्या चित्रपटात त्या बाल कलाकार होत्या. रेखा यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे १७५ हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेखाला भारत सरकारकडून रेखा यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Back to top button