दीपिकाची टॅलेंट मॅनेजर करिश्मा गायब, आता NCB ने पाठवले आईला समन्स  | पुढारी

दीपिकाची टॅलेंट मॅनेजर करिश्मा गायब, आता NCB ने पाठवले आईला समन्स 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या अडचणी वाढताना दिसत आहे. खरंतर, करिश्मा प्रकाशला एनसीबीकडून समन्स जारी करण्यात आलं होतं. परंतु, तिने एनसीबीला प्रतिसाद दिला नव्हता. एनसीबीने उपस्थित राहण्यास सांगितले असतानाही तिने कुठलेही उत्तर न दिल्याने आता करिश्माच्या आईला आणि ज्या कंपनीत ती काम करत होती, त्या कंपनीला दुसरे समन्स पाठवले आहे. 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनुसार, करिश्मा प्रकाशला काही दिवस आधी समन्स जारी करण्यात आलं होतं. परंतु, तिने समन्सला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आता करिश्माची आई मिताक्षरा पुरोहितला समन पाठवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत ड्रग प्रकरणात करिश्माचे नाव समोर आले होते. तेव्हापासून करिश्मा गायब आहे. तिचा मोबाईलदेखील बंद येत आहे. करिश्माची आई गोरेगावमध्ये राहते. तसेच एनसीबीने क्वान टॅलेंट एजन्सीलादेखील समन्स पाठवले आहे.

एनसीबीच्या माहितीनुसार, करिश्मा तपासापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. एनसीबीच्या टीमला करिश्माच्या घरातून ड्रग्ज सापडले होते. यासाठी तिला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, करिश्मा गायब झाली आहे. आता तिने कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला आहे.

वाचा – ‘विवाह’ फेम अमृता राव झाली आई; घरी नव्या पाहुण्याचे आगमन! 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी करिश्मा प्रकाशच्या वर्सोवा येथील घरी धाड टाकली होती. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,सुशांत केसमध्ये करिश्माचे नाव एका ड्रग पेडलरच्या चौकशीत समोर आले होते. 

वाचा – ‘दिल तो पागल है’ ला २३ वर्ष पूर्ण; किंग शाहरुखला माधुरीचा स्पेशल संदेश!

Back to top button