'मिर्झापूर'ची डिम्पी खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड | पुढारी

'मिर्झापूर'ची डिम्पी खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सध्या वेब सिरीजच्या दुनियेत अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओची लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर 2’ची चर्चा चांगलीच रंगली आहे. यासोबतच चर्चा सुरू आहे ती म्हणजे सध्या लूकमध्ये दिसणाऱ्या डिम्पीची. साध्या लूकमध्ये दिसणारी डिम्पी खऱ्या आयुष्यात मात्र, खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

मिर्झापूर २ वेब सीरिजमध्ये डिम्पीची भूमिका अभिनेत्री हर्षिता गौर हिने साकारली आहे. डीम्पी सध्या लूकमध्ये दिसणाली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र तिचा हॉट आणि बोल्ड लूक पाहायला मिळतो. हर्षिता गौर टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हर्षिता गौरने तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही सीरियल ‘सद्दा हक – माय लाइफ, माय चॉईस’मधून केली आहे. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, देव्यंदू शर्मा, अली फजल आणि विक्रांत मेसी या स्टार कास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. तसेच यामधील डिम्पी म्हणजे हर्षिता गौर, स्विटी म्हणजे श्रिया पिळगावकर आणि गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठी या अभिनेत्रींनी देखील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडली.

‘ओ चाचा, ओ चाचा’ मिर्झापूर २चा No Spoiler Review पाहिला का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.


 

Back to top button