अंकिता फियान्सेला म्हणते 'मला माफ कर' | पुढारी

अंकिता फियान्सेला म्हणते 'मला माफ कर'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून बी टाऊमधील मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे चांगलीच चर्चेत आली होती. सुशांतच्या निधनाला ४ महिने उलटून गेले आहेत. दरम्यान, ती आता तिच्या होणाऱ्या पतीमुळे पुन्हा चर्चेत आली असल्याचे पाहायला मिळाले आहे. तिने आपल्या होणाऱ्या पतीला पोस्ट लिहित ‘मला माफ कर’ असे म्हटले आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अंकिताने आपला होणारा पती म्हणजेच विक्की जैनसोबतचा एक क्लोज फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतेवेळेस ती भावूक झाली असल्याचे समजते. 

‘जेव्हा मी मला तुझ्यासोबत पाहते तेव्हा मी परमेश्वराचे आभार मानते, तुला माझ्या आयुष्यात  एक दोस्त, एक सोबती आणि जीवलग मित्र म्हणून पाठवल आहे. त्यासाठी तुझेदेखील आभार. माझ्या सर्व अडचणींमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच, वेळेप्रसंगी मदत करण्यासाठी धावून येतोस त्यासाठी धन्यवाद. माझा सपोर्ट सिस्टम बनन्यासाठी, आणि खरतर मला समजून घेण्यासाठी सर्वात आधी तुझे मी आभार मानते. 

तसेच ती पुढे म्हणाली, मला माफ कर. माझ्यामुळे तुला अनेक अडचणींचा सामना  करावा लागला. ज्याची तू कधीच अपेक्षा करू शकत नव्हतास. हे शब्द खूप कमी पडत आहेत. तुझे आभार मानण्यासाठी. मात्र, तुझे माझे हे बॉन्डींग खुप अमॅझिंग आहे. असे म्हणत अंकिताने लव्ह यू असेदेखील म्हटले आहे.

अंकिताची ही भावूक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टमुळे बी टाऊनमध्ये अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.  

Back to top button