गौहर खानच्या लग्नाची ठरली तारीख | पुढारी

गौहर खानच्या लग्नाची ठरली तारीख

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

‘बिग बॉस १४’ची विजेती आणि अभिनेत्री गौहर खान आणि संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा जैद दरबारशी लवकरच लग्न करणार आहे. दोन्ही परिवारांकडून या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गौहर खान आणि जैद दरबार सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तर गौहर खान जैदपेक्षा मोठी आहे. मात्र, गौहर आणि जैदने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, गौहर खान आणि जैद दरबार दोघांचा विवाह २४ डिसेंबर २०२० रोजी मुंबईत होणार आहे. तसेच हा विवाह सोहळा मुंबईतील एका हॉटेलमध्ये २ दिवस चालणार आहे. याआधी गौहर आणि जैद प्री-वेडिंग फोटोशूटसाठी गोव्याला गेले आहेत. गौहरने येथील ठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोत दोघेही खूपच रोमॉटिक मुडमध्ये दिसले आहेत. याशिवाय ते दोघेही एका विमानतळावर एकमेंकासोबत स्पॉट झाले आहेत.  

अधिक वाचा : जगातील सर्वांत उंच टॉवर बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख (VIDEO)

गौहर आणि जैदने या विवाह सोहळ्याविषयी कोणताच खुलासा केलेला नाही. परतु, जैदचे वडील इस्माइल दरबार यांनी त्यांना गौहर सून म्हणून पसंत असल्याचे सांगितले होते. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी जैद गौहराला घेऊन त्यांना आणि आईला भेटायला घरी आला होता, असा खुलासा इस्माइल दरबार यांनी केला होता. तसेच गौहर खान बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जैदने तिचे कौतुक केले होते. यावेळी एक पोस्ट केली होती. त्यात जैदने लिहिले होते की, तू नेहमी कामयाबी करत राहो. वेलकम बॅक क्वीन, तुझ्या जीवनात अधिकअधिक यश मिळत जावो. याशिवाय दोघांनी आपली जोडीला # गाझा असे नाव दिले होते.    

अधिक वाचा :  अंकिता फियान्सेला म्हणते ‘मला माफ कर’

(photo : gauaharkhan instagram वरून साभार)

 

Back to top button