रिंकू राजगुरू परतली मायदेशी   | पुढारी

रिंकू राजगुरू परतली मायदेशी  

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

‘सैराट’ चित्रपटानंतर चाहत्यांच्या मनात घर केलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू विदेशातून भारतात परतली आहे. रिंकू काही दिवसांपूर्वी लंडनच्या रस्त्यावर दिसली होती.  रिंकूने स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भारतात परत येत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.  

अधिक वाचा : नागराज मंजुळे यांच्या नव्या लघुपटाचा टीझर पाहिला का?

रिंकू राजगुरू ‘छुमंतर’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनला गेली होती. लंडनमध्ये रिंकूने शुटिंगसोबतच मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतला. यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. लंडनमध्ये रिंकूसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे स्टार्स होते. सध्या ‘छुमंतर’ या चित्रपटाचे शुटिंग संपवून हे स्टार्स मायदेशी म्हणजेच, भारतात परत येत आहेत. याबाबतची माहिती रिंकूने स्वत: सोशल मीडियावर देऊन एक पोस्ट केली आहे. यात तिने लिहिले आहे की, ‘बाय बाय लंडन, बॅक टू इंडिया’.

अधिक वाचा : अलका कुबलसोबत झालेल्या वादानंतर प्राजक्ता गायकवाडचा पलटवार   

याशिवाय ‘छुमंतर’ या चित्रपटातील इतर काही कलाकारांनी ही भारतात परत येत असल्याचे सांगितले आहे. ‘छुमंतर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.  (photo : iamrinkurajguru instagram वरून साभार)

 

Back to top button