अक्षयचा 'बम भोले' गाण्यात रौद्र अवतार (video)  | पुढारी

अक्षयचा 'बम भोले' गाण्यात रौद्र अवतार (video) 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

खिलाडी कुमार म्‍हणजेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांच्या आगामी ‘लक्ष्मी’ चित्रपटातील धमाकेदार गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे बोल ‘बम भोले’ असे आहेत अक्षयचे ‘बम भोले’ हे गाणे सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.  

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटातील ‘बम भोले’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात अक्षयचा रौद्र अवतार पाहायला मिळाला आहे. या गाण्यात अक्षय कुमार भगवान भोलेनाथ यांच्या भक्तीमध्ये तल्लीन होवून डान्स करताना दिसत आहेत. अक्षयचा या गाण्यातील डान्स पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या गाण्यात अक्षयने लाल साडी परिधान केली असून हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. तसेच या गाण्यात अक्षयने कधी रंग उधळला आहे तर कधी हातात भगवान भोलेनाथांचे त्रिशूल घेवून डान्स केला आहे.  

अधिक वाचा : तब्बूने गाठली पन्नाशी, म्हणते- ‘या’ व्यक्तीमुळे झालं नाही लग्न

अक्षय कुमारचे ‘बम भोले’ हे गाणे रिलीज झाल्यावर काही मिनिटांतच गाण्याला २५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांनी या गाण्याला खूपच पसंती दर्शविली आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक वायरस यांनी आपला आवाज दिला आहे. तर याला उल्लूमनाती यांनी संगीत दिले आहे. ‘बम भोले’ हे गाणे सोशल मीडियावर धुमधडाक्यात गाजत आहे. 

अधिक वाचा : अक्षयसोबत कृती पुन्हा झळकणार

याआधी ‘लक्ष्मी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरला. यावेळी या ट्रेलरला केवळ २४ तासांत ७० दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका दिसल्या. तसेच ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट यापूर्वी यावर्षीच्या मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट ‘मुमी २: कांचना’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट ९ नोव्हेंबर २०२० रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केले आहे.

(video : Zee Music Company youtube वरून साभार)

 

Back to top button