अभिनेता विजय राज यांची जामीनावर सुटका

गोंदिया : पुढारी ऑनलाईन
अभिनेता विजय राजला महिला सहकारी सदस्याचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गोंदिया येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय राजला ३ नोव्हेंबरला रामनगर पोलिसद्वारा गोंदिया न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली.
गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात बॉलिवूड चित्रपट शेरनीचे शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची अभिनेत्री विद्या बालनला क्रू सदस्यांसोबत सेटवर पूजा करताना पाहिले गेले होते. हे सर्व कलाकार गोंदियातील थ्री स्टार हॉटेल ‘द गेटवे’मध्ये थांबले आहेत.
वाचा – विनयभंगप्रकरणी अभिनेता विजय राजला अटक
विजय राजने ‘धमाल’, ‘मान्सून वेडिंग’, ‘गली बॉय’, ‘धमाल’, ‘लूटकेस’, ‘दिल्ली ६’, ‘रन’, ‘ड्रीम गर्ल’, ‘वेलकम’, ‘पटाखा’, ‘सूरमा’, ‘स्त्री’ आणि ‘अनवर’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विजय राज हॉटस्टारची वेब सीरीज ‘परिवॉर’मध्ये दिसले होते. या वेब सीरीजमध्ये त्याची मुख्य भूमिका होती. यामध्ये त्याच्या व्यक्तीरेखेचं नाव गंगाराम त्रिपाठी आहे. या वेब सीरीजमध्ये गजराज राव मुख्य भूमिकेत आहेत.
गंगूबाई काठियावडीमध्ये दिसणार
आलिया भट्ट स्टारर चित्रपट गंगूबाई काठियावडीमध्ये विजय राज दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय राजची चित्रपटात एक छोटी भूमिका असणार आहे.