श्रद्धा कपूरचा दिपीका पादुकोणला दे धक्का! | पुढारी

श्रद्धा कपूरचा दिपीका पादुकोणला दे धक्का!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

आघाडीची अभिनेत्री कोण? असे विचारला असता आपसूक सर्वांच्या तोंडातून बॉलीवडूची मस्तानी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव बाहेर येते. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री श्रद्धा कपूरची. दीपिका पदुकोणला पछाडत श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी तिसरी अभिनेत्री झाली आहे. 

वाचा : तरुणी आंटी म्हणताच महिलेची सटकली! केस धरुन रस्त्यावर दोघींचे ‘हाण की बडीव'(video)

यापूर्वी दीपिका तिसऱ्या स्थानी होती आणि श्रद्धा कपूर चौथ्या स्थानी होती. मात्र आता दीपिकाला मागे टाकत श्रद्धा तिस-या क्रमांकावर आली आहे. श्रद्धाचे इन्स्टावर ५ कोटी ६४ लाखापेक्षा अधिक तर दीपिकाचे ५ कोटी २३ लाख फॉलोअर्स आहेत.

वाचा :  आयुष्मानची बायको म्हणते मीच सांगितले होते, ‘त्या’ अभिनेत्रीसोबतचा रोमान्स सीन्स आणखी मोठा हवा!

श्रद्धाच्या पुढे अग्रस्थानी क्रिकेटर विराट कोहली आहे तर दुसऱ्या स्थानी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस आहे. विराट कोहलीचे फॉलोअर्स ८२.२ मिलीअन इतके आहेत तर प्रियांकाचे इन्स्टावर ५८.१ मिलीअन फॉलोअर्स आहेत. तसेच, आलिया भटचे ५ कोटी १ लाख, नेहा कक्करचे ४ कोटी ८२ लाख फॉलोअर्स आहेत.

श्रद्धा आणि दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर श्रद्धा लवकरच ती इच्छाधारी नागीन बनताना दिसणार आहे. एका सिनेमात ती नागीनची भूमिका साकारणार आहे. याशिवाय चंदा मामा दूर के, शॉटगन शादी या सिनेमात तिची वर्णी लागली आहे. लव रंजनच्या एका सिनेमातही ती झळणार आहे.

वाचा : पूनम पांडेने गोव्यातील ‘तो’ अश्‍लिल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून हटवला

तर दीपिका सध्या शकुन बत्राच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटींगसाठी दीपिका गेल्या काही दिवसांपासून गोव्याला होती. तिच्या या आगामी सिनेमात अनन्या पांडे व सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Back to top button