'विवाह' फेम अमृता रावने बाळाचे घातले बारसे; ठेवले 'हे' नाव | पुढारी

'विवाह' फेम अमृता रावने बाळाचे घातले बारसे; ठेवले 'हे' नाव

मुंबई: पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री अमृता राव आणि तिचा नवरा आरजे अनमोल आता पालक झाले आहेत. अमृता रावने १ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी सकाळी मुलाला जन्म दिला. जन्मानंतर तिने बाळाच्या हाताचा फोटो शेअर करत त्याचे नाव जाहीर केले आहे.

अमृता आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. काही दिवसांपूर्वी अमृता राव गर्भवती असल्याचे समोर आले होते. त्यानंतर १ नोव्हेंबरला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती तिने इन्स्टा अकाऊंटवरून जाहीर करत आनंद व्यक्त केला होता. यावेळी तिने मुलाचे नाव काय ठेवायचे हे सुचवा अशी मागणीदेखील आपल्या चाहत्यांना केली होती. 

दरम्यान, आज तिने पती अनमोल आणि स्वतःच्या हातामध्ये बाळाचा हात असलेला फोटो शेअर करत बाळाचे नाव ‘वीर’ ठेवले असल्याचे जाहीर केले. यासोबत तिने कॅप्शनदेखील दिली आहे. यामध्ये तिने हॅलो, माझा मुलगा वीर ला भेटा. तो पहिल्यादाच ब्रो फर्स्ट लुकमध्ये समोर आला आहे. असे सांगत आशीर्वादाची मागणी केली आहे. 

अमृता राव आणि अनमोलने 2016 मध्ये सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. त्याच्या लग्नाला कुटुंब आणि फक्त जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. अमृता राव यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती बाळासाहेब ठाकरे बायोपिकमध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात अमृताने नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

(photo : amrita_rao_insta instagram वरून साभार)

 

 

Back to top button