अनन्या पांडेला भेटली चाहती पण, उडाली तारांबळ (video) | पुढारी

अनन्या पांडेला भेटली चाहती पण, उडाली तारांबळ (video)

मुंबई : पुढारी ऑनलाईन

आपल्या आवडत्या स्टार्ससोबत फोटो काढण्याचा मोह अनेक चाहत्यांना असतो. यासाठी ते काहीही करू शकतात. अशीच एक घटना बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 

नुकतेच अनन्या पांडे चित्रपटांच्या शुटिंगसाठी घराबाहेर पडली. याच दरम्यान अनन्याच्या एका महिला फॅन्सला तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. चक्क तिने अनन्याजवळ उभे राहून फोटो काढला. याशिवाय तिने आपल्या दुकानाचे एक कार्ड देत आपल्या दुकानाला जरूर एकदा भेट द्या असे ही सांगितले. यावेळी तिच्या चित्रपटाची टीमही सोबत होती. या टीमने या महिला फॅन्सला बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. अचान झालेला या प्रकारामुळे अनन्यासह सर्वांचीच तारांबळ उडाली. 

अधिक वाचा : सायना नेहवालच्या बायोपिकचा नवा लूक 

अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यामुळे चाहते यावर अनेक कॉमेंन्टस् करत आहे.  

अधिक वाचा : ‘विवाह’ फेम अमृता रावने बाळाचे घातले बारसे; ठेवले ‘हे’ नाव

अनन्या पांडे आगामी ‘फायटर’ आणि ‘अनाम’ या दोन चित्रपटात झळकणार आहे. ‘फायटर’ या चित्रपटात अनन्या विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. अनन्या पांडेने ‘स्टुडेंट ऑफ द इयर २’, ‘पती पत्नी आणि वो’ आणि ‘खाली पीली’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केलं आहे.  

 (video : viralbhayani instagram वरून साभार)

 

Back to top button