मिर्झापूर : गुड्डू - बबलूंशी अभिनेता अली फजलचे 'हे' आहे नाते | पुढारी

मिर्झापूर : गुड्डू - बबलूंशी अभिनेता अली फजलचे 'हे' आहे नाते

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतात वेब सीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. अॅमेझोन प्राईवर आलेल्या मिर्झापूर या वेब सीरिजचे दोन्ही पार्ट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या वेब सीरिजची कथा, संवाद गाजली आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीरेखांचे मीम्स व्हायरल होत आहेत. कालीन भैय्या, बबलू, गुड्डू या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गुड्डू ही व्यक्तिरेखा अभिनेता अली फजल यानं साकारली आहे. ही व्यक्तीरेखा प्रचंड गाजली आहे. 

अभिनेता अली फजल याचे गुड्डू आणि बबलू या नावांशी खास नातं आहे. नुकतच त्याने सोशल मीडियावर याबाबत सांगितले आहे. त्याने मामांबरोबरचे त्याच्या लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याच्या दोन्ही मामांची टोपणनावं बबलू आणि गुड्डू असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये लिहून सांगितले आहे.

अभिनेता अली फजलच्या मोठ्या मामाचं टोपणनाव बबलू आहे. तर त्याच्या धाकट्या मामाचं नाव गुड्डू आहे. या दोन्ही मामांसोबतचे फोटो अलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बबलू आणि गुड्डू या सख्या भावांच्या व्यक्तीरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या व्यक्तीरेखांच्या मीम्सही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

 

वाचा : सायना नेहवालच्या बायोपिकचा नवा लूक 

वाचा : ‘विवाह’ फेम अमृता रावने बाळाचे घातले बारसे; ठेवले ‘हे’ नाव

 

 

 

Guddu .

A post shared by ali fazal (@alifazal9) on Oct 18, 2020 at 6:54pm PDT

Back to top button