कमल हसन यांचे सिनेमे पाहायला बुरखा घालून जायच्‍या श्रीदेवी  | पुढारी

कमल हसन यांचे सिनेमे पाहायला बुरखा घालून जायच्‍या श्रीदेवी 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

आज अभिनेते कमल हसन यांचा वाढदिवस. कमल हसन आणि श्रीदेवी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडायची. परंतु, कमल हसन श्रीदेवी यांना आपली  बहिण मानायचे. कमल हसन यांच्‍या वाढदिवसानिमित्त जाणून घ्‍या या खास गोष्‍टी. 

दाक्षिणात्‍य चित्रपट सृष्‍टीचे सुपरस्टार कमल हसन ७ नोव्‍हेंबरला आपला वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्‍या ६ वर्षी कमल यांनी आपल्‍या करिअरची सुरुवात केली. (१९५९).  

अधिक वाचा : चहलच्या होणाऱ्या बायकोचा इंग्लिश गाण्यावर जबरदस्त देसी ठेका! (video)

मोठ्‍या पडद्‍यावरील कमल हसन आणि श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली होती. कमल हसन श्रीदेवी यांना बहिण मानायचे. श्रीदेवी यांच्‍या निधनानंतर  एका कार्यक्रमात कमल हसन यांनी म्‍हटलं होतं की, ‘मी जेव्‍हा श्रीदेवीला भेटलो, तेव्‍हा ती १५-१६ वर्षांची होती. आम्‍हाला दोघांना कपल म्‍हणून कास्‍ट करण्‍यात आलं होतं. परंतु, रिअल लाईफमध्‍ये आम्‍ही भाऊ-बहिणीसारखे मोठे झालो. आम्‍हाला रोमँटिक चित्रपटात कास्‍ट करण्‍यात आल्‍यानंतर आम्‍ही पोट धरून हसलो. आम्‍ही एकाच कुटुंबातील सदस्‍य आहोत, असं आम्‍हाला वाटायचं.’ 

श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘एकदा मी कमल हसन यांच्‍या एका चित्रपटाची स्क्रीनिंग मिस केली होती. त्‍यामुळे तो चित्रपट थिएटरमध्‍ये पाहण्‍यासाठी मी बुरखा घातला होता. पब्लिकमध्‍ये जाताना हे करावं लागलं. मी खूप कमी वेळा चित्रपट पाहण्‍यासाठी थिएटरमध्‍ये जात होते. चित्रपटांचे स्पेशल स्क्रीनिंगचं मी पाहायला जात असे.’ 

अधिक वाचा :अनन्या पांडेला भेटली चाहती पण, उडाली तारांबळ (video)

श्रीदेवी यांना प्रसिध्‍दी मिळाली ती डायरेक्टर भरतराजा यांच्‍या ‘पथिनारू वयाधिनाइल’ या चित्रपटामुळे. या चित्रपटात कमल हसन आणि रजनीकांत होते. कमल हसन आणि श्रीदेवी यांची जोडी ‘कॉलीवुड’मध्‍ये हिट मानली जाते. दोघांनी जवळपास ४० चित्रपटात एकत्र काम केलं. 

‘सदमा’ हा चित्रपट कमल आणि श्रीदेवी यांच्‍या अभिनय कारकिर्दीतलं सर्वोच्च शिखर. हा चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांना श्रीदेवीतली अभिनेत्री कळाली. सदमामध्‍ये कमल यांची प्रमुख भूमिका होती. कमल यांनी श्रीदेवी यांच्‍यासोबत सदमा, आखिरी संग्राम यासह अनेक तमिळ चित्रपटात काम केलं. बालू महेंद्र यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेला ‘सदमा’ हा तमिळ चित्रपट ‘मूंदरम पिरई’चा रीमेक होता. 

Sridevi was like my sibling: Kamal Haasan | Tamil Movie News - Times of  India

अधिक वाचा :सायना नेहवालच्या बायोपिकचा नवा लूक 

श्रीदेवी यांनी एकदा एका मुलाखतीत म्‍हटलं होतं, ‘माझी मुलगी जान्‍हवीने सदमा चित्रपट पाहिल्‍यानंतर ती चिंतेत होती. ती केवळ ६ वर्षांची होती. त्‍यावेळी जान्‍हवी माझ्‍यासोबत ३ दिवस बोलली नव्‍हती. कारण मी, सदमा चित्रपटात कमल हसन यांना सोडून गेले होते. चित्रपट पाहिल्‍यानंतर जान्‍हवी मला म्‍हणाली होती, तू वाईट मम्मा आहेस. तुम्‍ही त्‍यांच्‍यासोबत वाईट वागलात.’ 

Back to top button