धसका घेतला की काय? 'शेरनी' कंगनाने पुन्हा मुंबई पोलिसांसमोर येण्याचे टाळले! | पुढारी

धसका घेतला की काय? 'शेरनी' कंगनाने पुन्हा मुंबई पोलिसांसमोर येण्याचे टाळले!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सध्या कंगना राणावत आणि वाद हे समीकरण एकमेकांसाठी असल्यासारखे वाटत आहे. काहीतरी वादग्रस्त विधाने करायची आणि चर्चेत यायचे कदाचित हाच मुख्य व्यवसाय आता कंगनाने स्वीकारला असावा. आता एका नव्या कृतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई पोलिसांसमोर जबाब नोंदविण्यासाठी कंगनाला मंगळवारी (दि.१०) हजर व्हायचे होते. पण, तिने हजर होणे टाळले. या आधीही पोलिसांसमोर हजर होणे तिने टाळले होते. 

वाचा : मिलिंद सोमण! आधी गोव्याच्या किनारी नग्‍न पळाला, आता केला हटके फोटो शेअर

एका प्रकरणाच्या चौकशी संदर्भात अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. पण तेव्हा दोघींनी आपण आपल्या भावाच्या लग्नामध्ये व्यग्र असल्याचे सांगून हजर राहण्यास टाळले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंगना आणि तिच्या बहिणीला आज हजर होण्यासाठी नोटीस बजावली होती. पण त्या दोघींनी पोलिसांसमोर हजर होणे टाळले आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रियाद्वारे जनसमुदायत वितुष्ट निर्माण करण्यास प्रोत्साहन दिल्या प्रकरणी या दोघी बहिणींना स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर रहायचे होते. यापूर्वी या प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी वांद्रे पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण, तेव्हा हिमाचल प्रदेश येथे आपल्या भावाच्या लग्नाच्या तयारी व्यग्र असल्याचे कंगना रानावत आणि रंगोली चंदेल यांनी आपल्या वकीलामार्फत पोलिसांनी कळवले होते. यानंतर पोलिसांनी दोघींना १० नोव्हेंबर रोजी पुन्हा हजर राहण्याची नोटीस ३ नोव्हेबर रोजी बजावली. यावेळी सुद्धा दोघींनी पोलिसांसमोर हजर होण्यास नकार दिला आहे. यावेळी ही दोघींनी अजूनही आपण भावाच्या लग्नातच व्यस्त असून आम्ही १५ नोव्हेंबर रोजी पोलिस ठाण्यात हजर होऊन आमचे म्हणणे मांडू असे कळवले आहे. 

वाचा : कॅटरिनाच्या मालदीवमधील विदाऊट मेकअप फोटोंनी चाहत्यांना केले घायाळ!

कंगना राणावत व तिच्या बहिणी विरोधात धार्मिक भावना भडकवणे आणि दोन समूहांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानावत अनेक वादात अडकल्याचे दिसून येत आहे. तिच्यावर विविध प्रकरणांतर्गत अनेक गुन्हे ही दाखल करण्यात आले आहेत. नुकतेच ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना राणावत हिच्यावर मानहाणीचा दावा ठोकला होता. 

काही दिवसांपूर्वी कंगना हीने जावेद अख्तर यांच्यावर आरोप केला होता की, ‘ऋतिक रोशन आणि माझ्या नात्यासंबधा विषयी चर्चा करायची आहे म्हणून मला घरी बोलावून जावेद अख्तर यांनी धमकावले होते’.

 वाचा : अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीचा छापा

Back to top button