‘त्या’ फोटोमुळे कार्डी बीला मागावी लागली माफी | पुढारी

‘त्या’ फोटोमुळे कार्डी बीला मागावी लागली माफी

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेची प्रसिद्ध गायिका कार्डी बी नेहमीच सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त व्यक्तव्याने आणि फोटोने चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी कार्डी बीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक फोटोशूट केले होते. मात्र, हे फोटो चाहत्यांना अजिबात आवडले नाहीत. यामुळे कार्डी बी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. यानंतर कार्डीने हा फोटो डिलीट करून चाहत्यांची ताबडतोब माफी मागितली आहे.    

कार्डीने काही दिवसांपुर्वी भारतीय देवतांच्या (दुर्गादेवी) शैलीतील एक फोटोशूट केलं होते. या फोटोत कार्डीने लाल रंगाचा ड्रेस घालून तिच्या पाठीमागे देवदेवतांसारखे अनेक हात दाखविण्यात आले होते. परंतु, तिच्या एका हातात शूज देखील दाखवले होते. यामुळे कार्डीने भारतीय देवतांचा अपमान केला असल्याची जोरदार टिका युजर्सकडून होत आहे. यामुळे ती सोशल मीडियावर खूपच ट्रोल झाली आहे. यानंतर कार्डीने सोशल मीडियावरील हा फोटो डिलीट करत आपल्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. 

कार्डीने भारतीय चाहत्यांची एक व्हिडीओ पोस्ट करुन माफी मागितली आहे. यात कार्डीने म्हटले आहे की, ‘कुठल्याही धर्माचा किंवा संस्कृतीचा अपमान करण्याच्या उद्देशाने मी फोटोशूट केलेले नाही. तरी देखील माझ्या या फोटोशूटमुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमकडून माफी मागते. यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.’ 

कार्डीने हा फोटो डिलीट केल्यावर देखील अनेक युजर्स यावर कॉमेन्टस् करत आहेत. यात एका युजर्सने लिहिली आहे की, ‘हिंदू धर्माची चेष्टा करणे हे एक ट्रेंड बनले आहे. स्टार्स जेव्हा पाहिजे तेव्हा धर्माची चेष्टा करत असतात.’ याशिवाय आणखी एका युजर्सनी लिहिले आहे की, ‘हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्याआधी हे स्टार्स अजिबात विचार करत नाहीत.’  

Back to top button