‘मिर्झापूर ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार! | पुढारी

‘मिर्झापूर ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ॲमझॉन प्राईम व्हिडिओने गुरुवारी ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या ३ -या सीझनवर काम सुरू केल्याची घोषणा केली. लवकरच स्रिप्टचे काम पूर्ण होईव व त्यानंतर चित्रीकरणास सुरुवात होईल, असं ॲमेझॉन प्राईमनं सांगितलं आहे. मागील महिन्यातच ॲमेझॉन प्राईमवर ‘मिर्झापूर’चा २ रा सीझन रिलीज झाला होता. याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. 

दरम्यान, ॲमेझॉनने मिर्झापूर २ संदर्भात एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. मिर्झापूर दोन रिलीज झाल्यानंतर सात दिवसाच्या आत सर्वाधिक पाहिली गेलेली जर कुठली वेब सीरिज असेल तर ती मिर्झापूर २, अशी माहिती ॲमेझॉन प्राईमने दिली आहे. 

मिर्झापूर २ मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी आणि राजेश तेलंग आहेत. ज्यांनी मागील सीझनमध्येही अभिनय केला होता. या सीझनमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेन्युली आणि ईशा तलवार यांची एन्ट्री होते. ज्यांनी आपले शानदार प्रदर्शन करून प्रेक्षांचे मन जिंकले. मीडिया रिपोर्टनुसार मिर्झापूर ३ मध्ये मुन्ना त्रिपाठीचा दरारा जारी राहिल. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वत: दिव्येंदु शर्माने याबाबत संकेत दिले आहेत. 

Back to top button