'देवमाणूस'मधील अपर्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?  | पुढारी

'देवमाणूस'मधील अपर्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेची छोट्या पडद्यावरील मालिका ‘देवमाणूस’ अल्पावधीत लोकप्रिय बनली आहे. डॉक्टरातला देवमाणूस शोधणाऱ्या गावकऱ्यांच्याच डोळ्यात धूळ फेकणाऱ्या एका क्रूर डॉक्टराच्या आयुष्यावर आधारीत ही मालिका आहे.  या मालिकेत डॉक्टर अजित कुमार देव हा अपर्णा नावाच्या मुलीला आपल्या जाळ्यात अडकवतो. तुम्हाला माहिती आहे का, ही अपर्णाची भूमिका साकारणारी ही तरुणी कोण आहे? 

Image may contain: 1 person

अपर्णाचे खरे नाव ऐश्वर्या नागेश असे आहे. ती मुळची चिपळूणची असून तिने डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. तर आर सी काळे हायस्कूल पेढे परशुराम येथून शालेय शिक्षण घेतले आहे. 

Image may contain: 1 person, close-up

तिने नाटकांमध्येही काम केलं आहे. ‘असंही घडू शकते’ या नाटकात ती झळकली होती. 

Image may contain: 1 person, smiling

शिवाय, तिने अनेक एकांकिका केल्या आहेत. 

Image may contain: 1 person

अनेक कथाकथन, मॉडेलिंग स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. 

Image may contain: 1 person

# ही टू नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये (२०१८) तिने काम केलं आहे. यामध्ये तिची मुख्य भूमिका होती. 

Image may contain: 1 person, close-up

सध्या ऐश्वर्या देवमाणूस या सत्य घटनेवर आधारित मालिकेत काम करत आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

यामध्ये तिची अपर्णाची भूमिका आहे.  

Image may contain: 1 person, close-up

No photo description available.

सर्व फोटो- Aishwarya Nagesh facebook वरून साभार 

 

Back to top button