फक्त ५० रुपयात कोणताही चित्रपट पाहा! | पुढारी

फक्त ५० रुपयात कोणताही चित्रपट पाहा!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरोना लॉकडाऊनमुळे देशभरात सिनेमागृहे ६ महिन्यांपासून अधिक काळ बंद होते. आता सरकार आणि चित्रपट उद्योग यांनी मिळून पुन्हा प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्याची तयारी सुरू केली आहे. ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह अनेक राज्यांमध्ये  सिनेमागृहे उघडली आहेत. आता यशराज फिल्म्स दिवाळीच्या औचित्याने प्रेक्षकांसाठी सुपरहिट चित्रपट सिनेमागृहात आणत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटांचे तिकिट दर केवळ ५० रु. असणार आहे. 

हे चित्रपट होणार रिलीज

YRF चे ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर-जारा’, ‘बंटी और बबली’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘एक था टायगर’, ‘जब तक है जान’, ‘बँड बाजा बारात’, ‘सुल्तान’, ‘मर्दानी’, ‘दम लगा के हईशा’सह अनेक चित्रपटांना YRF बिग स्क्रीन सेलिब्रेशनच्य़ा रुपात दाखवलं जाणार आहे. 

YRF च्या 50 वर्षांचं सेलिब्रेशन

यावर्षी YRF च्या ५० व्या वर्षांचं सेलिब्रेशन सुरू आहे. या औचित्याने क्लासिक आणि सुपरहिट चित्रपट दाखवले जाणार आहेत. 

Back to top button