गॅब्रिएलाची सलग दुसर्‍या दिवशी कसून चौकशी | पुढारी

गॅब्रिएलाची सलग दुसर्‍या दिवशी कसून चौकशी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिच्याकडे केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गुरुवारी कसून चौकशी केली. तिच्याकडे चौकशीची ही दुसरी फेरी असून अर्जुन रामपालकडे शुक्रवारी चौकशी करण्यात येणार आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्ज सेवन आणि तस्करीचा एनसीबीने पर्दाफाश करत आता अर्जुन रामपाल याच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. एनसीबीने सोमवारी अर्जुनच्या वांद्रे येथील घरीं छापा टाकला. या कारवाईनंतर एनसीबीने अर्जुनचा वाहन चालक आणि त्यानंतर अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्र्रिएला हिच्याकडे कसून चौकशी केली आहे.

अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोस डेमेट्रिएड्स याचे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह तिचा भाऊ शौविक, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांनी सुशांतसाठी ज्या ड्रग्ज डीलर्सकडून ड्रग्ज विकत घेतले होते. त्या ड्रग्ज पेडलर्ससोबत संबंध असल्याचे स्पष्ट झाले असल्याने एनसीबीने याबाबत गॅब्रिएलाकडे चौकशी केली.

अभिनेता सुशांत याने आत्महत्या केल्यानंतर त्याने नेमकी कशामुळे आत्महत्या केली याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यात त्याने ड्रग्ज सेवन केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

 

Back to top button