पूनम पांडेचं गोव्यातील व्हिडिओनाट्य | पुढारी | पुढारी

पूनम पांडेचं गोव्यातील व्हिडिओनाट्य | पुढारी

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

अभिनयापेक्षा इतर वादग्रस्त कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या पूनम पांडे हिचे काणकोणच्या चापोली धरणावर  चित्रीत करण्यात आलेले आणि सध्या वादग्रस्त ठरलेले ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते अश्लिल व्हिडिओ आघाडीच्या पॉर्न साईटवर पोस्ट झाले आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर गोव्याची बदनामी होऊ लागली आहे.

वाचा : अश्लिल व्हिडिओ प्रकरणी पूनम पांडेला गोवा पोलिसांनी घेतलं ताब्यात

चापोली धरणावर चित्रीत करण्यात आलेल्या अश्लिल व्हिडिओच्या प्रकरणाला आता आठवडा उलटला आहे. हा प्रकार उघडकीस येताच जलस्त्रोत खाते, काँग्रेस पक्ष तसच महिला संघटनांनी तिच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उत्तड गोव्यातील सिकेरी येथील हॉटेलवरून पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉंबे याला अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळालेला आहे. पण काणकोण न्यायालयाने त्यांना विविध अटी घातल्यामुळे त्यांना गोवा सोडून जाता आलेले नाही. अशा स्थितित गेल्या काही दिवसांपासून हे जोडपे दक्षिण गोव्यात वास्तव्याला आहे.

वाचा : पूनम पांडेने गोव्यातील ‘तो’ अश्‍लिल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून हटवला

नुकतेच पूनम पांडेचा सतरा मिनिटांचा व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओ अनेक पॉर्न साईटवर व्हायरल होत आहे. त्याला गोव्याच्या नावाचे शीर्षक दिले जात असल्याने पूनम पांडेच्या त्या अश्लिल व्हिडिओ बरोबर गोव्याचे नाव सुद्धा जागतिक पातळीवर क्रुप्रसिद्धीच्या झोतात आले आहे. 

वाचा : अभिनेत्री पूनम पांडेची पतीविरोधात मारहाण, विनयभांगाची तक्रार 

हनिमूनसाठी गोव्यात आलेल्या आणि नंतर पतीने मारहाण केली म्हणून पतीच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर पूनम पांडे चर्चेत आली होती. तिने गोव्यात चित्रित केलेला अत्यंत अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ उडाली. 

पूनम पांडे हनिमूनसाठी काणकोण तालुक्यातील एका हॉटेलमध्ये उतरली होती. याच दरम्यान आपल्या पतीने आपल्याला मारहाण केली आणि आपला विनयभंग केला अशी तक्रार तिने पोलिस स्थानकात नोंद केली होती. या प्रकरणाच्या एका महिन्यानंतर नुकताच सोशल मीडियावर त्या अभिनेत्रीचा अत्यंत अश्लिल स्वरूपाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सदर व्हिडिओ काणकोणमधील एका लहान धरणावर चित्रीत झालेला आहे. यात बंधार्‍यावरील पंप हाऊसचा चित्रीकरणासाठी वापर झालेला आहे. या मादक स्वरूपाच्या व्हिडिओत तिने नग्नतेचे दर्शन केले. 

Back to top button