करिश्मा कपूरनं जेव्हा आमिरला केलं होतं किस | पुढारी

करिश्मा कपूरनं जेव्हा आमिरला केलं होतं किस

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

करिश्मा कपूरचा चित्रपट ‘राजा हिंदुस्तानी’ला रिलीज होऊन २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट १९९६ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये करिश्मा आणि आमिर खानचा एक जबरदस्त किसिंग सीन होता. राजा हिंदुस्तानीमध्ये करिश्माने आमिरला किस सीन दिल्याने त्यावेळी खूप चर्चा झाली होती. हा सीन करण्यासाठी करिश्माने खूप बोल्ड निर्णय घेतला होता. करिश्माने या सीनशी संबंधित एक घटना सांगितली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटानंतर करिश्मा आणि आमिर कोणत्याही चित्रपटामध्ये एकत्र दिसले नव्हते. मुलाखतीमध्ये करिश्माने काही इंटरेस्टिंग गोष्टी शेअर केल्या होत्या. हा चित्रपट ४ तास २४ मिनिटांचा होता. परंतु, एडिट करून हा चित्रपट २ तास ५४ मिनिटांचा करण्यात आला. 

मुलाखतीत करिश्माने सांगितले की, राजा हिन्दुस्तानीबद्दल खूप साऱ्या आठवणीत आहेत. परंतु, जेव्हा हा चित्रपट आला, तेव्हा लोकांमध्ये ‘किसिंग’विषयी खूप चर्चा झाली होती. परंतु, कदाचित त्यांना माहिती नसेल की, किसिंग सीन शूट करायला आम्हाला तीन दिवस लागले होते. 

Quiz: Who was the original choice for Karisma Kapoor's role in Raja  Hindustani? - Rediff.com movies

करिश्मा म्हणाली होती की, मी हा विचार करत होते की, कधी संपणार हा किस सीन? कारण फेब्रुवारीच्या महिन्यात उटीमध्ये इतकी ठंडी होती आणि सायंकाळी ६ वाजता हा सीन शूट करण्यात आला होता. मी थंडीने हुडहुडत होते. 

ब्लॉकबस्टर राजा हिन्दुस्तानीमध्ये मुख्य भूमिकेसाठी करिश्मा कपूर नव्हे तर ऐश्वर्या रायला ऑफर होती. धर्मेश दर्शन यांनी ऐश्वर्याला या चित्रपटाबद्दल विचारले होते. परंतु, ऐश्वर्याने नकार दिला होता. त्यानंतर जूही चावलाला ही ऑफर मिळाली होती. त्यावेळी आमिर खानसोबत जूहीचे तू तू मै मै सुरू होते. त्यामुळे जुहीने चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पूजा भट्टला विचारण्यात आले, परंतु, आमिरने दिग्दर्शकाला म्हटले की, अशी अभिनेत्री घ्या, जिने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली नसेल. अखेर धर्मेश यांनी करिश्मा कपूरला साईन केलं. 

Raja Hindustani turns 21: Did you know Aamir Khan consumed one litre of  vodka for the film? - bollywood - Hindustan Times

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटातील गाणे ‘तेरे इश्क में नाचेंगे…’ मध्ये आमिरला नशेत दाखवण्यात आलं होतं. या गाण्यात रियल फील आणण्यासाठी आमिर खानने एक लिटर वोडकावर ताव मारला होता. 

‘राजा हिन्दुस्तानी’मध्ये काम करण्यासाठी आधी आमिर खानदेखील तयार नव्हता. परंतु, दिग्दर्शकाने आणिरला सांगितलं की, या चित्रपटातून चांगला बिझनेस होईल. यामध्ये आमिर-करिश्माच्या किसिंग सीनला बॉलिवूड चित्रपटातील सर्वात लॉन्ग किसिंग सीन मानला जातो. हा सीन शूट करण्याआधी दिग्दर्शक चिंतेत होते. किसिंग सीन वल्गर वाटू ने यासाठी त्यांनी कुठलाही ड्रामाशिवाय कमी म्युझिकमध्ये सीन शूट केला होता. 

Karisma Kapoor was shivering during the kissing scene in 'Raja Hindustani'  - OrissaPOST

या चित्रपटामध्ये करिश्मा कपूरला तिच्या अभिनयाबरोबरचं मेकओव्हरसाठीही ओळखले जाते. राजा हिंदुस्तानीसाठी करिश्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक धर्मेश यांनी या किस सीनविषयी सांगितलं होतं की, त्यांनी हा सीन लॉन्ग शूट केला होता. कारण, निर्मात्यांना वाटत होतं की, सेंसार बोर्ड या सीनला कात्री लावणार. पण, सेन्सॉर बोर्डने चित्रपटाला U सर्टिफिकेट दिलं. 

Karisma Kapoor Reveals How She Done Kissing Scene With Aamir Khan In Raja  Hindustani. करिश्मा कपूर

Back to top button