बॉयफ्रेंडसोबत थायलंडमध्ये आहे दिशा परमार, राहुलला आलंय टेंशन  | पुढारी

बॉयफ्रेंडसोबत थायलंडमध्ये आहे दिशा परमार, राहुलला आलंय टेंशन 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉसच्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने गायक राहुल वैद्यची खिल्ली उडवली. त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारच्या नावावरून सलमान खानने राहुलला दिशाला दिलेल्या प्रपोजलवरही प्रतिक्रिया दिली. परंतु, सलमान खान मस्तीच्या मूडमध्ये राहुलची चेष्टा करत होता, तर दुसरीकडे, राहुल वैद्य दबंग खानचे बोलणे ऐकून टेन्शनमध्ये दिसला.

खरंतर, सलमान खानने राहुल वैद्यला विचारलं की, दिशाच्या प्रपोजलचं काय झालं? यावर राहुल म्हणाला, दिशाकडून आतापर्यंत त्याच्या प्रपोजलचे कोणतेही उत्तर आलेले नाही. तेव्हा सलमानने चेष्टा करत म्हटले की, त्याला दिशाकडून उत्तर कसे मिळेल? ती यावेळी थायलंडमध्ये आहे आपल्या बॉयफ्रेंडसोबत. सलमान खानची ही चेष्टी ऐकून बिग बॉसच्या घरातील सर्वांमध्ये एकच हशा पिकला.  तर राहुल वैद्य सलमानच्या या गोष्टी ऐकून टेन्शनमध्ये आला. तो खूप घाबरलेला दिसला आणि अशा गोष्टी सांगू नकोस, असे सलमानला म्हणाला. 

राहुल वैद्य सलमान खानला म्हणाला, दिशा खरंच थायलंडमध्ये आहे? राहुल निराश झालेला पाहून सलमान खानने मजेत म्हटलं की-लोक थायलंडला आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत जातात? यानंतर सलमान खान राहुलला स्टोर रूममध्ये  जाण्यास सांगतात.

राहुल वैद्यने मागील एका एपिसोडमध्ये दिशा परमारला नॅशनल टेलीव्हिजनवर लग्नासाठी प्रपोज केलं होतं. 

 

Back to top button