नोरा फतेहीचा डायरेक्ट डोक्यावर तलवार ठेवून दिलखेचक बेली डान्स! (Video) | पुढारी

नोरा फतेहीचा डायरेक्ट डोक्यावर तलवार ठेवून दिलखेचक बेली डान्स! (Video)

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेहीने नेहमी आपल्या डान्स मुव्ह्जने लोकांची मने जिंकली आहेत. तिचा सध्या सोशल मीडियावर एक जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही डोक्यावर आणि कंबरेवर तलवार ठेवून बेली डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये नोरा सलमान खान आणि कॅटरीना कैफचे सुपरहिट गाणे ‘माशाल्लाह’वर घायाळ मुव्ह्ज दाखवत आहे. नोराचा हा व्हिडिओ एका फॅन पेजद्वारा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याआधीही नोराने अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. कधी आगीशी खेळताना तर कधी वाळूमध्ये डान्स करताना ती दिसली होती.

नोराचा गुरु रंधावासोबत म्युझिक व्हिडिओ ‘नाच मेरी रानी’ यूट्यूबवर रिलीज झाला होता. व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर काही तासांच्या आत १.१ कोटी व्ह्यूव्स मिळाले होते. दरम्यान, नोरा फतेही लवकरच ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहेत. 

(video – norafatehimagic insta वरून साभार)

Back to top button