नेहा कक्करचे लिपलॉक फोटो व्हायरल | पुढारी

नेहा कक्करचे लिपलॉक फोटो व्हायरल

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

नेहा कक्कर सध्या आपल्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेन्ड करत आहे. तिने हनीमून व्हेकेशनचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती रोहनप्रीतसोबत स्पेशल डेट एन्जॉय करत आहे. खास म्हणजे, दोघांचा लिपकिसवाला फोटोही व्हायरल होत आहे. 

वाचा – नोरा फतेहीचा डायरेक्ट डोक्यावर तलवार ठेवून दिलखेचक बेली डान्स! (Video)

नेहाने फोटोज शेअर करताना लिहिले, ‘हनीमून डायरीज’. नेहाने आणखी काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये तिने राहत असलेल्या हॉटेलचे फोटोज शेअर केले आहेत. फोटोज शेअर करताना नेहाने लिहिलंय, ‘लव्ह यू रोहनप्रीत सिंह…बेस्ट हनमून.’

नेहा आणि रोहनप्रीत दोघे ‘नेहू द व्याह’ गाण्याच्यावेळी एकत्र आले होते. रोहनप्रीत सिंहने नेहासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं की, त्याला माहिती नव्हतं की, नेहाने जे गाणे लिहिलं आहे, ते रिअल लाईफमध्ये त्या दोघांसाठी खरे ठरेल.

रोहनप्रीत म्हणाला होता की, “आम्ही दोघे पहिल्यांदा नेहू द व्याह गाण्याच्या सेटवर एकमेकांना भेटलो होतो. मला माहिती नव्हतं की, नेहाने गाण्याच्या लाईन्स कशा लिहिल्या. आणि मला माहित नव्हतं की, या गाण्याच्या लाईन्स आमच्या खऱ्या आयुष्यात सत्यात उतरतील. या गाण्यानंतर माझे आयुष्य बदलले.”

रोहनप्रीत सिंह म्हणाला की, ‘नेहा पहिल्या नजरेतलं प्रेम होतं. नेहा, एक अशी मुलगी आहे, जी जमिनिशी जोडली गेली आहे. तिला मी प्रपोज करण्याचे नियोजन केलं. एक दिवस धाडसाने प्रपोज केलं आणि नेहाने होकार दिला. आभारी आहे परमेश्वरा.’

Back to top button