'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी इतकी बदलली! | पुढारी

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी इतकी बदलली!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटात भुमिका निभावलेली लहान मुलगी मुन्नी सध्या जोरदार सोशल मीडियात चर्चेत आहे. बजरंगी भाईजानमध्ये भुमिका बजावलेली हर्षाली मल्होत्राने (मुन्नी) दिवाळीतील काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे ती सध्या जोरदार चर्चेत आहे. सलमानसोबत चांगले काम केल्याने हर्षाली चांगलीच फेमस झाली होती.

अधिक वाचा :एकवेळ म्हशीचे हंबरणं चालेल, पण अमृता फडणवीसांचं गाणं नको; महेश टिळेकरांची टीका 

बजरंगी भाईजानमध्ये छोटीशी हर्षाली आता मोठी दिसत आहे. पाकिस्तानची मुलगी भारतात चुकल्याने सलमान त्या मुलीला पाकिस्तानमध्ये तिच्या पालकांकडे सोडण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. मुन्नीला पाकिस्तानात सोडताना मुन्नीचे सगळे हट्ट पुरवते. यामुळे बजरंगी भाईजान प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस आला. चित्रपटातील मुन्नी आता मोठी झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

अधिक वाचा : ‘कोलावरी डी’नंतर धनुषचे आणखी एक गाणे हिट!

सध्या हर्षाली मल्होत्राचे फोटो ओळखू शकणार नाही इतका तिच्यात बदल झाला आहे. २०१५ ला प्रदर्शीत झालेल्या बजरंगी भाईजानमध्ये हर्षाली अवघ्या ७ वर्षांची होती. ती आता १२ वर्षांची झाली आहे. दिवाळी आणि भाऊबीजेचे काढलेले फोटो तिने सोशल मिडीयावर टाकल्याने चांगलीच चर्चेत आली आहे. याचबरोबर नेटकऱ्यांनी तीच्या वेगवेगळ्या अदांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Back to top button