'माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे, शस्त्र टाकली आहेत, मानसिक दृष्ट्या हरलोय' | पुढारी

'माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे, शस्त्र टाकली आहेत, मानसिक दृष्ट्या हरलोय'

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

झगमगत्या विश्वात कधी कधी कलाकारांना काम मिळत नाही तर कधी कुणाचे आयुष्‌  उद्धवस्त होते. तर कुणी आजारपणामुळे त्रस्त झालेले असते. आता प्रसिद्ध लेखक, अभिनेता राजन पाटील यांनीही एक भावूक फोसबूक पोस्ट शेअर केली आहे. आजारपणाला कंटाळल्यामुळे मी शस्त्र टाकली आहेत, असं ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहा. 

“नमस्कार मंडळी, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एखादा क्षण येतो की तो माणूस राहत नाही. माणसाचा ऑथेल्लो किंवा हॅम्लेट का होतो याला तर्कशुद्ध उत्तर नाही. तो तसा होतो याला कारण त्याच्या आयुष्यातला ‘ तो ‘ क्षण. माझ्या आयुष्यात तो क्षण आला. सर्वकाही असह्य झालं. पराभव समोर उभा राहिला. आणि त्या क्षणाने घात केला.fb वर पोस्ट सोडली. कच खाल्ली. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषानं व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. सावध झालो. लज्जित झालो. खाडकन मुस्काटात बसल्यानंतर जाग यावी तसा भानावर आलो. स्वतःला खडसावले, ‘ साल्या, लोक तुला बघून, तुला आदर्श मानून आयुष्यात लढा सोडत नाहीत. हरणारी लढाई सुद्द्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतात ही. आणि तू ? तुला लढायला हवं. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू फसवणार ? लाज वाटत नाही? नेता बनायची हौस आहे ना, मग नेत्यासारखे वाग. आता माघार नाही. शेंडी तुटो वा पारंबी, पण लढाई सोडायची नाही ‘ मंडळी, तुम्ही जो आवाज माझ्या कानाखाली काढलात त्याचे पडसाद आता माझ्या मृत्युबरोबरच्या लढाईत उमटणार हे निश्चित. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार ! हर हर महादेव !…राजन पाटील”. 

त्याआधी राजन यांनी आणखी एक पोस्ट लिहिली आहे-

‘नमस्कार मंडळी, 

माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय. 

माझं जगणं आता जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलेय. मला त्यात स्वारस्य नाही.

तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा. 

नमस्कार…

…राजन पाटील.

राजन पाटील हे अभिनेत्याबपोबरचं लेखकदेखील आहेत. ‘रंग माझा, माझ माणसं’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तोची एक समर्थ’, ‘बरड’, ‘मुंबई आमचीच’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘मित्र’, ‘शर्यत’ अशी नाटके, मालिका आणि चित्रपट त्यांनी काम केले आहे.

 

Back to top button