...म्हणून 'या' बॉलिवूड सेलिब्रिटीनं दान केले 'ब्रेस्ट मिल्क' | पुढारी

...म्हणून 'या' बॉलिवूड सेलिब्रिटीनं दान केले 'ब्रेस्ट मिल्क'

मुंबई: पुढारी ऑनलाईन

गेल्या दोन दिवसांपासून ‘सांड की आँख’ चित्रपट निर्माती निधि परमार यांची बी टाऊनमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. परमार यानी मुंबईतील सूर्या हॉस्पिटलला जवळपास ४० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केले आहे. त्यांनी ही माहिती स्वतःहून दिली आहे. 

निर्माती निधी परमार हिरानंदानी यंदाच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रसूत झाली. ज्यानंतर लॉकडाऊनच्या काळात तिनं ब्रेस्ट मिल्क दान करण्याचा निर्णय घेतला. 

का केल ‘ब्रेस्ट मिल्क’ दान

द बेटर इंडिया या माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘बाळाच्या जन्मानंतर आणि त्याच्या संगोपनादरम्यान माझ्या लक्षात आलं की माझ्या शरीरात बरंच दूध तयार होत आहे. मी इंटरनेटवर वाचलं होतं की ब्रेस्ट मिल्कला योग्य पद्धतीनं फ्रिजमध्ये ठेवल्यास ते तीन ते चार महिने खराब होत नाही.

तसेच, निधीनं याबाबत बरीच माहिती मिळवली. इंटरनेटवर तिला यापासून फेसपॅक तयार करतात अशीही माहिती मिळाली. काही मित्रांकडून निधीला माहिती मिळाली की, यापासून मुलांना अंघोळही घालतात किंवा याचा वापर त्यांच्या पायांना मसाज करण्यासाठी केला जातो. पण, हे असं करणं म्हणजे दुध वाया घालवणं असा निधीचा समज झाला. परिणामी कोणा गरजवंताला दूध देण्याचं ठरवत ती ब्रेस्ट मिल्क डोनेशनच्या पर्यायावर पोहोचली.

 सूर्या हॉस्पिटलला जवळपास ४० लीटर ब्रेस्ट मिल्क दान 

निधी परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, तुम्ही सूर्या हॉस्पिटलमध्ये दूध दान करन शकता. तेव्हापर्यंत माझ्या फ्रिजमध्ये १५० मिलिलीटरचे २० पॅकेट्स साठले होते. पण, लॉकडाऊनच्या काळात हे ब्रेस्टमिल्क दान करणे मला एक समस्या वाटत होतं. पण, रुग्णालयाने मला कमालीचे सहकार्य केले. त्यांनी सुरक्षित पद्धतीने दूध नेण्याची व्यवस्था केली’. 

Back to top button