मृत्यूने मला लवकर घेऊन जावे अशी प्रार्थना करा | पुढारी

मृत्यूने मला लवकर घेऊन जावे अशी प्रार्थना करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा… असे म्हणणारी अभिनेता राजन पाटील यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. मराठी कलाविश्‍वात नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार्‍या अभिनेत्याची ही पोस्ट अनेकांच्याच मनात कालवाकालव करत आहे.

नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्रे टाकली आहेत. मानसिकद‍ृष्ट्या मी हरलोय, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा… अशी पोस्ट पाटील यांनी सोशल मीडियावर केली आहे. 

पाटील यांची पहिली पोस्ट हार पत्करणारी आहे. मात्र, पाटील यांनी केलेल्या दुसर्‍या पोस्टवरून चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आव्हानांचा सामना करण्यास आपण सज्ज असल्याची तयारी त्यांनी दुसर्‍या पोस्टमधून दाखवली आहे. हतबल होणार्‍या राजन पाटील यांच्या या पोस्टमागचे कारण अद्याप समजलेले नाही.

Back to top button