प्राजक्ताने उचलली ४२ किलो वजनाची खंडा तलवार | पुढारी

प्राजक्ताने उचलली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

पुणे: पुढारी ऑनलाईन

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड जेजुरी गडावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत आघाडीची ठरलेली अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत झालेला तिचा वाद चांगलाचा चर्चेत आला होता. दरम्यान, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत तिने जेजुरी गड चढला आणि तेथील ४२ किलो वजनाची खंडा तलवार उचलली. तिने याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

रविवार हा सुट्टीचा दिवस. याचेच निमित्त साधत प्राजक्ता गायकवाडने थेट जेजुरी गड गाठले. तिथे पोहोचल्यावर जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. याचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर करत याची माहिती दिली आहे. यासोबतच तिने गडावरील ४२ किलो वजनाची खंडा तलवार उचलण्याच धाडस केल आहे. ”४२ किलो वजनाची खंडा तलवार …. सदानंदाचा यळकोट ….🙏🙏🙏” अशी कॅप्शन देत तिने तलवार उचलेला फोटो शेअर केला आहे. 

अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत झालेल्या  वादाच्या पार्श्वभूमीवर ‘आई माझी काळुबाई’ मालिका नुकतीच तिने सोडली आहे. यापूर्वी प्राजक्ताने झी मराठीच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाईंची व्यक्तिरेखा साकारली होती.  तिच्या या व्यक्तिरेखेला चाहत्यांनी चांगलीच दाद दिली होती.

Back to top button