अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल | पुढारी

अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

मुंबई: पुढारी ऑनलाईन

‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली नंदीता म्हणजेच छोट्या पडद्यावरच्या वहिणीसाहेब अर्थातच अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्री लवकरच आई होणार असून नुकतेच तिनं डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. सध्या मराठी सिनेसृष्टीत तिच्या डोहाळे जेवणाच्या फोटोशुटची चर्चा रंगली आहे. 

धनश्रीनं काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना एक सुखद धक्का दिला होता. पती दुर्वेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर तिच्या आयुष्यातील खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती.  या व्हिडीओमध्ये तिने आई होणार असल्याची माहिती दिली होती. 

 

Back to top button