‘तारक मेहता’ मधील भिडे सरांच्या मुलीचे बिकीनीतील फोटो व्हायरल | पुढारी

‘तारक मेहता’ मधील भिडे सरांच्या मुलीचे बिकीनीतील फोटो व्हायरल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमधील आत्माराम भिडे यांच्या मुलीचे पात्र करणारी अभिनेत्री निधी भानुशालीचे गोव्यातील बिकीनी मधील फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. सोनू भिडे या नावाचे पात्र अभिनेत्री निधी भानुशाली हिने ‘तारक मेहता’ या मालिकेत साकारले आहे. सोनू हे पात्र अवघ्या घराघरात पोहचले आहे. या मालिकेतील आत्माराम भिडे हे मराठी पात्र असल्याने तमाम मराठी प्रेक्षक भिडे आणि त्यांच्या कुंटुंबाचे चाहते आहेत. सोनूची ही मादक अदा पाहून तमाम प्रेक्षक अवाकच झाले आहेत. आपल्या पोरीचा हा प्रताप पाहिल्यावर कायम शिस्तीत राहणाऱ्या आत्माराम भिडे सरांचा चष्मा मात्र उलटा झाला असेल.

अभिनेत्री निधी भानुशाली ही सध्या गोवा येथे आपला व्हेकेशन एन्जॉय करत आहे. यावेळी तीने येथील समुद्र किनारी हॉट असे बिकीनीतील फोटो शूट केले आहेत. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवरील अकाउंट वर हे फोटो शेअर केले आहेत. निधीचा हा अनोख अंदाज तमाम चाहत्यांना फारच भावल्याचे दिसत आहे. त्यामुळे भानुशालीचे बिकीनीतील फोटो खूपच व्हायरल होत आहेत. तसेच तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंटचा पाऊसच पाडला आहे. त्यातील एका चाहत्याने ‘भिडे सर आपकी बेटी हाथसे निकल गई ’ अशी कमेंट दिली आहे. 

आज पर्यंत ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मध्ये सोनू या पात्रात निधीला अत्यंत सोज्वळ अशा मराठी मुलीच्या भूमिकेत सर्वांनी पाहिले आहे. यानंतर ती एकदम बिकीनीमधील पोजमध्ये चाहत्यांसमोर आल्याने सारेच चाहते अवाक झाले आहेत. हा तिचा मादक अंदाज साऱ्यांना खूपच मोहित करत आहे. याशिवाय गोव्यातील अन्य काही फोटो निधी भानुशाली हिने आपल्या अकाउंटवरुन शेअर केले आहेत. यालाही चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

Back to top button