'लाडाची मी लेक गं’! फेम मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल | पुढारी

'लाडाची मी लेक गं’! फेम मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल

मुंबई: पुढारी ऑनलाईन

नुकतीच सुरू झालेली नवी मालिका म्हणजेच ‘लाडाची मी लेक गं’! फेम अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या एका फोटोमुळे सध्या चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये ती खुप बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टी तिच्या या बोल्ड अंदाजाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. 

मितालीने पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमधील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतेवेळेस तिने कन्या राशिचा संदर्भ दिला आहे. कन्या राशिला अधिक निर्णायक मानले जाते आणि त्यातील मी एक कन्या आहे. असे मितालीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’! या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. काही दिवसापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत मितालीने लग्नाआधीचा पाडवा साजरा केला असून पुढच्या वर्षी ‘मिस्टर अँड मिसेस’ होणार असल्याचं म्हणत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. आता अनलॉकदरम्यान हळूहळू एक-एक गोष्टी सुरु होत असताना नवीन वर्षात हे ‘क्यूट कपल’ लग्नगाठ बांधणार आहे.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केले आहे. 

Back to top button