सोनाक्षी सिन्हाच्या मालदीव बीचवर हॉट अदा | पुढारी

सोनाक्षी सिन्हाच्या मालदीव बीचवर हॉट अदा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. मालदीवमधील तिचे काही फोटोज सध्या सोथल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बीचवर ती एन्जॉय करताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाची अदा पाहून फॅन्स तिचे भरभरून कौतुक करत आहेत. सोनाक्षी सिन्हाने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

सोनाक्षी सिन्हा फोटोमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. तिचे बीचवरील आणि समुद्राच्या पाण्यातील फोटो पाहण्यासारखे आहेत. ब्लॅक ॲण्ड व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये तिचा लुकदेखील खूप सुंदर दिसत आहे. याशिवाय अभिनेत्रीने ब्रेकफास्टचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यामध्ये ती बीचवर ब्रेकफास्ट एन्जॉय करताना दिसत आहे. 

सोनाक्षीचा पुढील चित्रपट अजय देवगन आणि संजय दत्तसोबत ‘भुजः द प्राईड ऑफ इंडिया’ असणार आहे. हा चित्रपट अभिषेक दूधैया यांनी दिग्दर्शित केला आहे. 

 

Back to top button