जॅकलीन फर्नांडिस झाली पुन्हा टॉपलेस (photos) | पुढारी

जॅकलीन फर्नांडिस झाली पुन्हा टॉपलेस (photos)

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

जॅकलिन फर्नांडिसने पुन्हा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॅकलिनच्या या मोनोक्रोम फोटोवर चाहते फिदा झाले आहेत. सर्व तिच्या सौंदर्याचे आणि हॉटनेसचे कौतुक करीत आहेत. तिने तो फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘बहुत बहुत दूर’ असे लिहले आहे. 

सध्या जॅकलिन धर्मशाळा येथे भूत-पोलिस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे शुटींग नुकतेच सुरू झाले आहे. जॅकलिन एक महिना हिलस्टेशन्समध्ये राहणार आहे, त्यानंतर ती मुंबईत परत येईल आणि रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टीच्या चित्रपट सर्कसचे शुटींग करणार आहे.

जॅकलिन फर्नांडिसने केला बेली डान्स व्हिडिओ व्हायरल 

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ने आपल्या कामा बरोबरच वेगवेगळ्या अदांनी चाहत्यांमध्ये जागा बनवली आहे. तिची फक्त चित्रपटांमुळे लोकांमध्ये ओळख नाही तर तिची स्टाईल व डान्समुळे ओळख आहे. सद्या सोशल मीडियात जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत जॅकलिन ‘गेंदा फुल’ या गाण्यावर बेली डान्स केला आहे. तिचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी डान्स टीचर संजना मुथरेजाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. 

या डान्समध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि संजना मुथरेजाचा डान्स अप्रतिम आहे. त्या झेंडूच्या फुलांवर नाचत असताना तिची स्टेप अप्रतिम आहे. यापूर्वीही संजना मुथरेजाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबरोबर आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. 

वाचा : अल्लू अर्जुन-पूजा हेगडेच्या ‘बूटा बोम्मा’चा धुमाकूळ! (Video)

वाचा : कंगनाला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

Back to top button