अभिनेता आशिष रॉय यांचे निधन | पुढारी

अभिनेता आशिष रॉय यांचे निधन

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

टीव्ही आणि चित्रपट इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेते आशिष रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या. मागील काही वर्षांपासून ते डायलिसिसचे उपचार घेत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती ठिक नव्हती. अखेरच्या क्षणी त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. 

लॉकडाऊनमध्ये त्यांची प्रकृती बिघडली होती. आशिषने इंडस्ट्रीतील लोकांकडे मदत मागितली होती. आर्थिक मदत मिळाल्यानंतर आशिष रॉय उपचार घेऊन घरी परतले होत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते आठवड्यात तीन दिवस डायलिसिससाठी रुग्णालयात जात होते. 

व्हॉईस ओवर आर्टिस्ट म्हणून काम

आशिष टीव्ही आणि चित्रपट अभिनेते होते. ते थिएटर आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचे कामदेखील करत होते. त्यांना लिखाणाचीही आवड होती. आशिष यांना यावर्षी जानेवारीमध्ये माईल्ड स्ट्रोकदेखील आला होता. उपचारासाठी त्यांनी आपल्याकडील सर्व पैसे खर्च केले होते. 

अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी डबसाठी आवाज

आशिष यांनी अनेक हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांसाठी डबिंग केलं होतं. त्यांनी‌ ‘सुपरमॅन रिटर्न्स’, ‘द डार्क नाईट’, ‘गार्जियन ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्जन’, ‘जोकर’ यासारखे अनेक डब्ड हॉलिवूड चित्रपटांतील मुख्य भूमिकांसाठी आपला आवाज दिला होता. 

चित्रपट, मालिकेत काम 

आशिष यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तसेच ‘ब्योमकेश बख्शी’, ‘बनेगी अपनी बात’, ‘यस सर’, ‘बा बहू और बेबी’, ‘ससुराल सिमर का’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘कुछ रंग ऐसे भी’, ‘आरंभ’ यासारक्या मालिकेत काम केलं होतं. 

वाचा -आर्थिक सुधारणांचा वेग कोरोनाकाळातही कायम

Back to top button