शेफाली शाहच्या 'Delhi Crime'नं जिंकला बेस्ट ड्रामा सीरीजचा आंतरराष्ट्रीय एमी ॲवॉर्ड  | पुढारी

शेफाली शाहच्या 'Delhi Crime'नं जिंकला बेस्ट ड्रामा सीरीजचा आंतरराष्ट्रीय एमी ॲवॉर्ड 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

‘दिल्ली क्राईम’ या हिंदी वेब सीरीजनं बेस्ट ड्रामा सीरीजचा यंदाचा आंतरराष्ट्रीय एमी ॲवॉर्ड जिंकला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय एमी ॲवॉर्ड जिंकणारी ही पहिलीच भारतीय ड्रामा सीरीज आहे. आंतरराष्ट्रीय एमी ॲवॉर्डने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर एमी ॲवॉर्डची घोषणा केली आहे. 

‘दिल्ली क्राईम’ ही ड्रामा सीरीज दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकरणावर आहे. दिल्ली पोलिसांनी किती तत्परतेने या प्रकरणाचा तपास केला आणि काही तासांतच मुख्य आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना किती अडचणींचा सामना करावा लागला हे सीरीजमध्ये दाखविण्यात आले आहे.

सात भागांची असलेल्या या वेब सीरीजमध्ये शेफाली शाह डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिकेत आहे. सीरीजचे दिग्दर्शन रिची मेहता यांनी केले आहे. दिल्ली क्राईमने बेस्ट ड्रामी सीरीज विभागात ॲवॉर्ड जिंकल्यानंतर शेफाली शाहने सोशल मीडियाच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले आहे.      

 

Back to top button