करण जोहर- मधूर भांडारकर वादावर पडदा  | पुढारी

करण जोहर- मधूर भांडारकर वादावर पडदा 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून करण जोहर आणि दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्यात वाद सुरू होता. आता या वादावर अखेर पदडा पडला आहे. चोरीच्या आरोपानंतर करण जोहरने हात जोडून माफी मागितली आहे. मधूर भांडारकर यांनी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा आरोप केला होता. आता करण जोहरने पोस्ट शेअर करून भांडारकर यांची माफी मागितली आहे.

करणने पोस्टमध्ये म्हटलंय, ‘प्रिय मधूर, आपण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि या इंडस्ट्रीचा एक भाग आपण आहोत. मला तुझे काम आवडते. मी तुझ्या कामाचा खूप मोठा चाहता आहे. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहात. मी तुझी माफी मागतो. माझ्या सीरिजचे नाव Fabulous Lives of Bollywood Wives असे ठेवले आहे. हे एक वेगळं टायटल आहे. या सीरिजची कथा, फॉरमॅट आणि टायटल वेगळं आहे. या सीरिजचा तुझ्या चित्रपटावर कोणताच इफेक्ट होणार नाही. आपण हा वाद विसरुन पुढे जाऊ, अशी मला आशा आहे.’  

प्रकरण काय आहे? 

मागील आठवड्यात करण जोहरने आपल्या वेब रिॲलिटी शो ‘द फॅबुलस लाईव्स ऑफ बॉलिवूड वाईव्स’चा ट्रेलर रिलीज केला होता. याचे स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर होणार आहे. चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी त्याच्यावर आणि त्याची कंपनी धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहतावर आरोप केला आहे की, करणने त्याच्या वेब शोसाठी त्याच्या चित्रपटाचे नाव चोरले आहे. मधुर भंडारकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. 

भांडारकरांनी लिहिले होते की, “प्रिय करण जोहर! आपण आणि अपूर्व मेहता यांनी माझ्याकडे ‘बॉलिवूड वाईव्स’ची टायटल मागितले होते. परंतु, मी नकार दिला होता. कारण, माझ्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. परंतु, आपण हे चुकीचे आहे की, आपण ‘द फॅबुलस लाईव्स ऑफ बॉलिवूड वाईव्स’चा वापर केला. प्लीज माझा प्रोजेक्ट बाद करू नका. माझी आपणास विनंती आहे की, आपण टायटल बदला.”

IMPPA मध्ये धर्मा प्रोडक्शनची तक्रार 

सोशल मीडियावर आपले दु:ख व्यक्त करण्याबरोबरचं मधूर भंडारकर यांनी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) मध्येदेखील धर्मा प्रोडक्शनविरोधात तक्रार दाखल केली होती. IMPPA चे म्हणणे होते की, त्यांनी करण जोहरला त्याच्या वेब शोसाठी टायटल जारी केलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार, असोसिएशनने या संदर्भात धर्मा प्रोडक्शन आणि नेटफ्लिक्सला पत्र लिहून टायटल बदलण्यास सांगितले आहे. त्यांच्या वेब शोमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या पत्नींच्या आयुष्याबाबत सागितलं जाणार आहे. 

 

Back to top button