कियारा अडवाणी 'हीलें टुट गयी' वर थिरकली! | पुढारी

कियारा अडवाणी 'हीलें टुट गयी' वर थिरकली!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि आदित्य सील यांच्या आगामी ‘इंदू की जवानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये आजच्या युगातील प्रेमाची संकल्पना दर्शविली गेली असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची सध्या गाणी रिलीज होत आहेत. निर्मात्यांनी कियारा आणि आदित्यचे ‘इंदू की जवानी’ मधील दुसरे गाणे सध्या रिलीज केले आहे.  

अधिक वाचा : मुंबई हल्ल्यातील २६/११ चे हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा बायोपिक चर्चेत

‘इंदू की जवानी’मधील या गाण्याचे बोल ‘हीलें टुट गयी’ असे आहे. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडीवर आधारित आहे. या व्डिडिओत कियारा आणि आदित्य एका पार्टीत रोमॉटिक मुडमध्ये थिरकले आहेत. या गाण्यात कियाराने सिललर सीक्विन ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. याशिवाय गाण्याच्या दुसऱ्या भागात कियाराने वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत. या गाण्यात पंजाबी गायक गुरु रंधावाची झलक पाहायला मिळाली आहे. हे गाणे बादशाह आणि आस्था गिल यांनी गायले आहे. गाण्याचे बोल स्वत: बादशाह यांनी लिहिले आहेत.

अधिक वाचा : माझ्यावर विषप्रयोग झाला होता, पण ‘त्या’विरोधात पुरावा नव्हता : लता मंगेशकर

‘इंदू की जवानी’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि आदित्य सील यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा इंदिरा गुप्ता उर्फ इंदु यांच्या जीवनावर आधारित आहेत. या चित्रपटात मल्लिका दुआ ही कियाराची ऑनस्क्रीन बेस्ट फ्रेंड आहे. या चित्रपटात कियारा सिंगल असून ती डेटिंगच्या माध्यमातून एक चांगला मित्र मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘इंदू की जवानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अबीर सेनगुप्ता यांनी केलं आहे. भूषण कुमार, दिव्य खोसला कुमार, कृष्णा कुमार, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी, रायन स्टीफन, निरंजन अय्यंगार यांनी हा चित्रपटाची निर्मिती केली आहे.  

(video : T-Series youtube वरून साभार)

 

Back to top button