अनफेयर अँड लव्हली  | पुढारी | पुढारी

अनफेयर अँड लव्हली  | पुढारी

हॉलीवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थसोबत ‘एक्स्ट्रॅक्शन’मध्ये काम केल्यानंतर रणदीप हुडाने नुकतेच त्याच्या ‘अनफेयर अँड लव्हली’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. रंगभेदाचा सामना करावा लागणार्‍या सावळ्या रंगाच्या महिलेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात  रणदीपसोबत इलियाना डिक्रूज आहे. याशिवाय रणदीप सलमान खानच्या ‘राधे – युवर मोस्ट वाँटेड भाई’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दरम्यान, नीरज पाठक दिग्दर्शित ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये रणदीप प्रमुख भूमिका साकारत आहे. उत्तर प्रदेशमधील सुप्रसिद्ध पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित ही सीरिज आहे. डिसेंबरपासून या वेबसीरिजच्या चित्रीकरणास सुरुवात होत आहे. 

Back to top button