हिमांशी खुराना जेव्हा पार्टीत रडते तेव्हा...(video)  | पुढारी

हिमांशी खुराना जेव्हा पार्टीत रडते तेव्हा...(video) 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री हिमांशी खुरानाला पंजाबची ‘ऐश्वर्या राय’ म्हणूनही ओळखले जाते. हिमांशी ‘बिग बॉस १३’ नंतर सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली होती. यानंतर तिने नेहमी आपले फोटो आणि व्डिडिओ शेअर केले. सध्या हिमांशीचा एका पार्टीत रडत असल्याचा व्डिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.   

अधिक वाचा : सारा-वरूणच्या ‘कुली नंबर १’ चा ट्रेलर पाहाच

हिमांशी खुरानाने आपल्या इन्स्टांग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘मी आयुष्यात आशा सोडून दिली होती, की कोणीतरी माझे असेल. पण आपण मित्रांनी हे सिद्ध केले की, कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही. आम्हाला गेल्या काही काळात खूपच त्रास सहन करावा लागला. परंतु, आम्ही एकमेकांपासून वेगळे होवू शकलो नाही. या आश्चर्यबद्दल माझी टीम आणि कुटुंबाचे मी आभार मानते.’ या व्डिडिओमध्ये हिमांशी जोरजोराने रडत असल्याचे दिसते. याआधी हिमांशीने आसिम रियाजसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.  

अधिक वाचा :   कियारा अडवाणी ‘हीलें टुट गयी’ वर थिरकली!

हिमांशी खुराना सोशल मीडियावर नेहमी खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. फोटो आणि व्डिडिओसोबत हिमांशीने शेतकरी चळवळीत ही आपला सहभाग दर्शविला होता. याआधी हिमांशी खुरानाला कोरोनाची लागण झाली होती.

(video, photo : iamhimanshikhurana instagram वरून साभार)


 

 

Back to top button